ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १० : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२५ साठी एकूण १२ शिक्षकांची निवड करण्यात आली असून या शिक्षकांचा गौरव सोहळा ११ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे होणार आहे.गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील १२ शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये वनश्री जाधव (वि.शि., जि.प. शाळा गोगाव, गडचिरोली, प्रीती नवघडे (प्रा.शि., जि.प. शाळा कुनघाडा रै, चामोर्शी), शीतल कुमरे (वि.शि., जि.प. शाळा बिहीटेकला, कोरची), बालाजी मुंडे (प्रा.शि., जि.प. शाळा बदबदा, कुरखेडा), प्रवीण मुंजमकर (प्रा.शि., जि.प. शाळा बोळधा, देसाईगंज), हेमलता आखाडे (वि.शि., जि.प. शाळा शिवणी बु., आरमोरी),सिंपल मुधोळकर (वि.शि., जि.प. शाळा डुम्मे, एटापल्ली), उज्ज्वला बोगामी (पदवीधर शिक्षिका, जि.प. शाळा आरेवाडा, भामरागड), मुरली गाइन (प्रा.शि., जि.प. शाळा विजयनगर, मुलचेरा),सुरेखा मेश्राम (प्रा.शि., जि.प. शाळा शिवणीपाठ, अहेरी), रमेश रच्चावार (पद.शि., जि.प. शाळा नगरम, सिरोंचा), विलास दरडे (प्रा.शि., जि.प. शाळा उदेगाव, धानोरा) आदींचा समावेश आहे. ११ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात निवड झालेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. शिक्षकांच्या गुणवत्तावर्धनाच्या कार्याची दखल घेत त्यांच्या योगदानाला गौरविण्याचा हा उपक्रम असून शिक्षण क्षेत्रातील कार्याला प्रेरणा मिळण्याचा हेतू यामागे आहे. नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (योजना) नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाबासाहेब पवार यांनी केले आहे.
————————————–










