ग्लोबल गडचिरोली न्यूज,
जहाल माओवादी नेता व केंद्रीय समिती सदस्य माडवी हिडमा आणि इतर ५ माओवाद्यांचा मंगळवार (ता. १८) झालेल्या चकमकीत खात्मा झाला. या पार्श्वभूमीवर आत्मसमर्पण केलेल्या पीबीएम / सीसीएम आणि सीपीआय (माओवादी) चा माजी प्रवक्त्ता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू उर्फ अभय याने गडचिरोली पोलिस विभागाच्या माध्यमातून व्हिडिओद्वारे उर्वरीत माओवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले आहे. त्याचा हा व्हिडीओ हिंदीत असून आम्ही आमच्या वाचकांसाठी त्याचे आवाहन संपूर्ण मराठी भाषेत देत आहोत नक्की वाचा.
साथी,
मागील काही दिवसांपासून सातत्याने चकमकींची बातमी मिळत आहे. पूर्वीसुद्धा काही लोकांनी आपला जीव गमावला आहे. आज सकाळपासून चकमकीची बातमी मिळत आहे. यात हिडमासह सहा जणांनी आपले प्राण गमावले आहेत. हा खुप चिंताजनक विषय आहे. याप्रसंगी मला आपण सर्व लोकांना हे सांगायचे आहे की, आम्ही जवळपास दीड महिन्यांपूर्वी शस्त्र सोडले आहेत. कारण तुम्ही सगळेच लोकं जाणता की, आपण लोकांनी बदललेल्या परीस्थितीत पुन्हा शस्त्रांसह संघर्ष नाही करू शकत. असा विचार करून आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये आलो आहोत. आज आम्ही जनतेचे मुद्दे घेऊन संविधानाला अनुसरून समस्या सोडवण्याचे कार्य करू शकतो. म्हणून आपण शस्त्रांसोबत बरेच काही गमावले आहे. बरेच नुकसान सहन करावे लागले. आज जग बदलले आहे, देश बदलला आहे. परीस्थिती बदलत आहे, म्हणून आपण शस्त्रांनिशी लढण्याऐवजी शस्त्रे सोडून जनतेत येऊन संविधानाला अनुसरून काम करायचे आहे. हाच आपल्यापुढे एक महत्त्वाचा पर्याय आहे. आपण सगळ्या लोकांनी या विषयावर विचार करावा, असा मी आग्रह करत आहे. यापूर्वीही मी तुम्लाहा हा संदेश दिला होता आणि आजही देत आहे. कृपया या संदेशाकडे दुर्लक्ष न करता तुम्ही लोकांनी शस्त्रे त्यागून सामान्य जनतेत येऊन संविधानाला अनुसरून काम करावे. मी आधीही तुम्हाला माझा फोन नंबर दिला होता. तुम्ही माझ्याशी कधीही संपर्क साधू शकता. माझा मोबाईल नंबर ८८५६०३८५३३ हा आहे.
———————————-










