प्रभाग १३ मध्ये भारती दिनेश नवघरे यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

224

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २९ : नगरपालिका निवडणुकीचे वातावरण रंगात आले असून प्रत्येक प्रभागांत प्रचाराचा धुरळा उडताना दिसत आहे. प्रभाग क्रमांक १३ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार भारती दिनेश नवघरे यांना मिळत असलेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्यासाठी उत्साह वाढवणारा व जनतेसाठी लक्षवेधी ठरत आहे. त्यांच्या प्रचारसभा, पदयात्रा आणि गृहभेटींना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या प्रभागात त्यांची लोकप्रियता वाढत आहे.

निवडणूक जाहीर होताच भारती दिनेश नवघरे यांनी प्रभागातील सर्वच वस्ती-भागांमध्ये नियोजनबद्ध प्रचाराला सुरुवात केली. गल्ली–बोळातील गृहभेटीत त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत मुद्देसूद चर्चा केली. स्थानिक समस्या, नागरिकांच्या अपेक्षा, विकासकामांचे प्राधान्यक्रम आणि सुशासनाविषयीची त्यांची दृष्टी त्यांनी प्रामाणिकपणे मांडली. त्यांच्या या साध्या आणि सर्वसमावेशक संवादशैलीमुळे अनेक नागरिकांनी त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ केल्याचे दिसून येते. “समोर येऊन समस्या, व्यथा ऐकणारा उमेदवार हवा”, “जमिनीवर येऊन काम करणारा प्रतिनिधीच योग्य” अशी मतदारांची भावना व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांत प्रभागातील रस्त्यांचे मजबुतीकरण, पाण्याच्या समस्यांवरील उपाययोजना, नाली–व्यवस्थेचा विस्तार, पथदिव्यांची दुरुस्ती, कचरा व्यवस्थापनासारख्या महत्त्वाच्या समस्या सोडवण्याच्या कार्यात नवघरे यांनी सातत्याने सहभाग घेतला. या कामांच्या अनुभवामुळे त्यांची प्रतिमा जनमानसात लोकप्रिय झाली आहे. नगरपालिकेच्या विविध विभागांशी समन्वय साधून प्रभागातील अडथळे दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न व जनसेवेची इच्छशक्ती जनतेच्या पसंतीस उतरत आहे. प्रभागात भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क मोहीम राबवली आहे. बूथस्तरीय संघटन, वाॅर्डनिहाय बैठका, पदयात्रा, महिला बैठका आणि छोट्या सभांच्या माध्यमातून पक्षाचा संदेश व्यापकपणे पोहोचवण्यात येत आहे. वरिष्ठ नेते आणि पदाधिकारीही नवघरे यांच्या प्रचारासाठी सक्रिय झाले असून प्रभागातील वातावरणात उत्साह आणि स्पर्धा दोन्ही वाढवित आहेत. यादरम्यान भारती दिनेश नवघरे यांनी “सुरक्षित व स्वच्छ प्रभाग”, “प्रकाशमान रस्ते”, “महिलांसाठी विशेष सुविधा” यांसारख्या मुद्द्यांना प्राधान्य दिल्याने महिलांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. महिलांच्या सुरक्षेपासून ते मूलभूत सुविधांपर्यंत सर्वच बाबतीत त्यांनी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. युवा वर्गासाठी रोजगार-उपयुक्त उपक्रम, क्रीडा सुविधा वाढविणे, डिजिटल साधनांची उपलब्धता, युवकांसाठी प्रशिक्षण यासारखे विषय त्यांच्याकडून ठामपणे मांडले जात आहेत. स्थानिक नागरिकांनी त्यांच्यासंदर्भात दिलेल्या प्रतिक्रिया अत्यंत सकारात्मक आहेत. काही रहिवाशांनी सांगितले की, मागील काही वर्षांत प्रभागाच्या विकासाला अपेक्षित गती मिळाली नाही; त्यामुळे नवघरे यांच्याबद्दलच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

—————————————-