प्रकाश वसंत निकुरे यांची प्रभाग क्र. ५ मध्ये प्रचारात घोडदौड

142

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २९ : जिल्ह्यात सध्या गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज या तीन नगर परीषदांची निवडणूक सुरू असून सर्वत्र प्रचाराची धूम आहे. अशातच भारतीय जनता पक्षाकडून शहर विकासाचे कमळ फुलवण्यासाठी सज्ज झालेले प्रकाश वसंत निकुरे यांची प्रभाग क्र. ५ मध्ये प्रचारात घोडदौड सुरू आहे.

केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षासाठी गडचिरोलीची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. प्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयातील गडचिरोली नगर परीषद सध्या निवडणूक विश्वाच्या केंद्रस्थानी आहे. येथे सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने सर्वतोपरी तयारी केली असून अगदी पारखून आपले उमेदवार निवडले आहे. सामाजिक संवेदनशीलता, सेवाभाव, सामाजिक समस्यांची जाण, त्या समस्या सोडवण्याची क्षमता आणि जनतेचे म्हणणे ऐकण्याची व त्यांच्या कल्याणासाठी झटत राहण्याची आवड असलेल्या लोकांच्या निवडीवर पक्षाने भर दिला आहे. अशाच गुणवंत लोकांपैकी एक असलेले प्रकाश निकुरे यांना पक्षाने उमेदवारी दिली. या उमेदवारीच्या माध्यमातून जनतेचा आशीर्वाद घेऊन अॅड. प्रणोती निंबोरकर यांच्या नेतृत्वात शहराचा कायापालट करून विकासाची गंगा प्रवाहित करण्यासठी प्रकाश निकुरे सज्ज झाले आहेत. त्यासाठी ते प्रभाग क्र. ५ पिंजून काढत असून सर्वत्र त्यांचे प्रेमाने व उत्साहाने स्वागत होत आहे. अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवणारे प्रकाश निकुरे एक उत्तम नेतृत्वाचे धनी म्हणून ओळखले जातात. जनतेने संधी दिल्यास अनेक वर्षांपासून जपलेले जनविकासाचे व गडचिरोली शहराच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करता येईल. जनतेचा मिळणारा सकारात्मक प्रतिसाद सुखावणारा व उत्साह वाढवणारा आहे, असेही ते म्हणाले.

————————–