“नवीन वर्ष* – नवी उमेद, नवा विकास” नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांचे प्रिय जनतेला नववर्षी मनःपूर्वक शुभेच्छा.

158

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

गडचिरोली, ता.३१:नवीन वर्षाच्या निमित्ताने गडचिरोली शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. प्रणोती सागर निंबोरकर यांनी शहरातील सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या असून, नववर्षात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या उत्साहाने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

 

आपल्या शुभेच्छा संदेशात नगराध्यक्ष निंबोरकर म्हणाल्या की, “नवीन वर्ष म्हणजे नव्या आशा, नवे संकल्प आणि नगराच्या उज्ज्वल भविष्यासाठी नव्या उत्साहाने काम करण्याची नवी सुरुवात आहे. नगराचा सर्वांगीण विकास, स्वच्छता, सुरक्षितता आणि प्रगती हेच माझे प्राधान्य राहिले असून पुढेही तेच राहील.”

 

*यासोबतच निवडणुकीच्या काळात अथक परिश्रम घेतलेल्या सहकारी, पदाधिकारी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, “दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांमुळेच आज जनतेची सेवा करण्याची सन्मानाची संधी मला मिळाली आहे.”*

 

*नवीन वर्षात प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात आरोग्य, सुख, समाधान आणि यश नांदावे, तसेच गडचिरोली शहर अधिक सक्षम, सुंदर आणि प्रगतीशील व्हावे, अशी ईश्वरचरणी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली.*

 

*नवीन वर्षाच्या प्रारंभीच सकारात्मकता, एकोपा आणि विकासाचा संदेश देणाऱ्या या शुभेच्छा संदेशाचे नागरिकांकडून स्वागत होत असून, “जनतेसोबत… जनतेसाठी… विकासाच्या मार्गावर सदैव” हा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.