MEMC सप्ताहात LMEL च्या महिला टीमकडून पुरस्कार स्वीकार; खाण क्षेत्रातील समावेशकतेचे प्रभावी उदाहरण

74

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ६ जानेवारी २०२६: नागपूर येथील हॉटेल रीजेंटा येथे ३६व्या मायन्स एन्व्हायर्नमेंट अँड मिनरल कन्झर्व्हेशन (MEMC) सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात देशभरातील खाण उद्योगाशी संबंधित विविध भागधारकांनी सहभाग नोंदवला. पर्यावरण संरक्षण, शाश्वत खाणकाम आणि खनिज संवर्धनासंदर्भातील उपक्रम व उत्तम पद्धतींचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. हा वार्षिक कार्यक्रम भारतीय खान ब्युरो (IBM) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला जातो.

या प्रतिष्ठित कार्यक्रमात लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) यांच्या सुरजागड आयर्न ओअर माइन्सने फुली-मेकनाइज्ड ओपन कास्ट माइन्स या श्रेणीत संयुक्त द्वितीय पुरस्कार पटकावला. हा सन्मान अल्ट्राटेक सिमेंटच्या नाओकारी लाइमस्टोन माइन्ससोबत संयुक्तपणे प्रदान करण्यात आला. कंपनीच्या वतीने हा पुरस्कार LMEL च्या महिला टीमने स्वीकारला. खाण क्षेत्रातील समावेशक सहभागाचे हे महत्त्वपूर्ण उदाहरण ठरले.

या प्रसंगी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय खान ब्युरोचे अधिकारी तसेच विविध खाण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने शाश्वत व जबाबदार खाणकामाबाबतची आपली कटिबद्धता अधोरेखित करणारे विविध उपक्रम सादर केले. यामध्ये ग्रीन माइनिंग पद्धती, बँडेड हेमेटाईट क्वार्ट्झाईट (BHQ) चे बेनिफिशिएशन, स्लरी पाइपलाईन प्रकल्प, पेलेट प्लांटचे संचालन तसेच विविध कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांचा समावेश होता.

LMEL च्या सहभागाचे विशेष आकर्षण म्हणजे कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेला आत्मविश्वासपूर्ण संवाद. महिला टीमने आपल्या कार्याचा आणि व्यावसायिक अनुभवांचा सविस्तर आढावा मांडला. खाण उद्योगात समावेशकता आणि विविधतेला प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या योगदानाचे अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

टीमच्या यशाबद्दल अभिनंदन करत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन यांनी कंपनीच्या हरित, स्वच्छ आणि शाश्वत खाणकामाच्या दृष्टीकोनाला पुढे नेण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. राष्ट्रीय पातळीवर लॉयड्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे त्यांनी विशेष अभिनंदन करत महिला सक्षमीकरणाबाबत कंपनीची सातत्यपूर्ण बांधिलकी अधोरेखित केली.

 

LMEL – सुरजागड आयर्न ओअर माइन्सला मिळालेले पुरस्कार

३६व्या MEMC सप्ताहात लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या सुरजागड आयर्न ओअर माइन्सने खालील पुरस्कार पटकावले:

कमी दर्जाच्या खनिजांचे बेनिफिशिएशन व उपयोग – प्रथम पुरस्कार

वनीकरण – प्रथम पुरस्कार

शाश्वत विकास – द्वितीय पुरस्कार

पद्धतशीर व शास्त्रीय विकास – तृतीय पुरस्कार

एकूण कामगिरी (ओव्हरऑल) – द्वितीय पुरस्कार

हे पुरस्कार शाश्वत खाणकाम पद्धती, पर्यावरण संरक्षण आणि जबाबदार संसाधन व्यवस्थापनामध्ये लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या नेतृत्वाची ठाम पुष्टी करतात.