राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचा (CIIIT)च्या विद्यार्थ्यांशी संवाद

52

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २३ : राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी नुकतीच गोंडवाना विद्यापीठ आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड ट्रेनिंग (CIIIT), सेंटरला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संस्थेतील विद्यार्थी व प्राध्यापकांशी संवाद साधत शैक्षणिक व कौशल्यविकास उपक्रमांचा आढावा घेतला.

मुख्य सचिवांनी विविध प्रयोगशाळा व प्रकल्प सादरीकरण विभागांना भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रॉडक्ट डिझाइन अँड डेव्हलपमेंट, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) तसेच इंडस्ट्रियल ऑटोमेशन या क्षेत्रांतील प्रकल्प, प्रत्यक्ष कार्यरत मॉडेल्स व त्यांचे औद्योगिक उपयोग सादर केले. यावेळी नागपूर विभागीय आयुक्त विजया विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्याम खंडारे, संचालक न. न. व. सा. प्रो. मनीष उत्तरवार, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे, टाटा टेक्नॉलॉजीचे भारत प्रकल्प संचालक प्रशांत हांडीगुंड, महाराष्ट्र प्रकल्प संचालक युवराज पाटील, CIIIT चंद्रपूरचे प्रभारी अरुण कोहली, CIIIT गडचिरोलीचे वरिष्ठ अभियंता आनंदा राठोड, कनिष्ठ अभियंते दिनेश बोलीवार, आदित्य कोल्हटकर, लिखित आखाडे, रोशन गड्डे तसेच CIIIT गडचिरोलीची संपूर्ण टीम उपस्थित होती. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्य सचिव अग्रवाल यांनी त्यांच्या तांत्रिक कौशल्यांचे, नवोन्मेषी दृष्टिकोनाचे व उद्योगाभिमुख प्रशिक्षणाचे कौतुक केले. आधुनिक तंत्रज्ञान, नवकल्पना आणि उद्योजकतेवर भर देत विद्यार्थ्यांनी रोजगारनिर्मिती व राज्याच्या विकासात योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले. ग्रामीण व आदिवासी भागातील युवकांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण व प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव देण्यासाठी CIIITसारख्या संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. भेटीचा समारोप प्रेरणादायी मार्गदर्शन व सामूहिक संवादाने झाला.

——————————-