सकल हिंदू समाज, इंदिरानगर–स्नेहनगर वस्तीच्या वतीने “विराट हिंदू संमेलन” थाटात संपन्न

84

ग्लोबल गडचिरोली न्यूज

 

गडचिरोली, ता. ८ मार्च : धर्मरक्षण, संस्कृती संवर्धन आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दिवा अधिक तेजाने प्रज्वलित करण्याच्या उद्देशाने तसेच हिंदू जागरणाच्या कार्याला नवी ऊर्जा व चेतना देण्यासाठी सकल हिंदू समाज, इंदिरानगर–स्नेहनगर वस्ती गडचिरोली यांच्या वतीने “विराट हिंदू संमेलन” चे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम इंदिरानगर येथील नगरपरिषद शाळेजवळील पटांगणात उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

या संमेलनाला इस्कॉनचे अध्यक्ष प.पू. परमेश्वरदास महाराज यांचे आशीर्वचन लाभले, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक श्री. रवीजी भुसारी आणि मा. सौ. लताताई समर्थ यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातून सनातन संस्कृतीचे महत्त्व, समाजातील एकात्मता आणि हिंदू समाजाने एकत्र येण्याची गरज यावर प्रकाश टाकण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सौ. योगिताताई प्रमोदजी पिपरे (भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका, माजी नगराध्यक्ष, न.प. गडचिरोली), मा. श्री. प्रमोदजी पिपरे (संचालक – महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणे तथा माजी सभापती, न.प. गडचिरोली), मा. श्री. अनिलजी कुनघाटकर (बांधकाम सभापती, न.प. गडचिरोली), मा. श्री. बाळासाहेब पद्मावार (माजी व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया), सौ. मामीडवार ताई, सौ. बोलुवार ताई यांच्यासह अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमाला परिसरातील महिला भगिनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे आयोजन श्री. संतोष बोलूवार, श्री. विक्की कागदलवार आणि सकल हिंदू समाज, इंदिरानगर–स्नेहनगर वस्ती गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रमाची सांगता भारत मातेच्या आरतीने करण्यात आली. संपूर्ण परिसरात देशभक्ती व एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले होते.