वडीलांसह तेंदूपाने तोडत असताना त्याला अस्वलाने केले जखमी

84

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

कोरची, ता. १६ : तालुक्यातील खसोळा येथील एक मुलगा आपल्या वडिलांसोबत जंगलात तेंदूपाने तोडत असताना अस्वलाने अचानक हल्ला केल्याने जखमी झाला. ही घटना गुरुवार (ता. १६) सकाळी घडली. हर्षद गणपत नरोटे (वय १४) रा. खसोळा, असे जखमी मुलाचे नाव आहे.

सध्या तेंदूपाने तोडण्याचा हंगाम सुरू असून अनेकजण जंगलात पाने तोडायला जातात. गुरुवारी सकाळी कोरची या तालुकास्थळापासून २५ किलोमीटर अंतरावरील खसोळा येथील हर्षद नरोटे हा मुलगा आपल्या वडिलांसोबत त्यांच्या शेतालगतच्या जंगलात तेंदूपाने तोडायला गेला होता. एवढ्यात अस्वलाने मुलावर हल्ला केला. यात तो जखमी झाला. अस्वलाने हर्षदच्या पाठीवर तीन ठिकाणी ओरबडले. मात्र, वडील आणि कुत्रे सोबत असल्याने तो बचावला. त्याला कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याला १० टाके लागले असून सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय कोरची यांनी दिली आहे.