कसारी फाट्यावर दुचाकीस्वाराचा मृतदेह

58
  • ग्लोबल गडचिरोली न्यूज,
  • गडचिरोली, ता. १७ : कसारी फाट्याच्या जवळ दुचाकीसह स्वाराचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे.. ही घटना शुक्रवार १७ मे रोजी सकाळच्या सुमारास घडली असून मृताचे नाव कैलास मधुकर नाकाडे (वय ४५) रा. बोलधा, ता. देसाईगंज, असे आहे.
  • कसारी फाट्याा नजीक रस्त्याच्या कडेला कैलास नाकाडे दुचाकीसह पडलेले काही नागरिकांना दिसले. दरम्यान पाहणी केली असता अपघात झालेला दिसून आला. देसाईगंज पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली. कैलासच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीर मृत्यू झाला. परंतु नेमका अपघात झाला कसा हे कोणालाच कळले नाही. अज्ञात वाहन धडक देऊन पसार झाले असावे, असा अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेचा तपास देसाईगंज पोलिस स्टेशनचे पोलिस करत आहेत. अधिक तपासानंतरच या घटनेमागील कारणे कळू शकतील.