विजपुरवठा संदर्भातल्या समस्या तात्काळ मिटवा. भाजपा अहेरी.

71

भाजपचे पदाधिकारी व नगरसेवकांनी आलापल्ली येथील महावितरणाच्या कार्यालयात धडकले.

 

अहेरी शहरात मागिल बर्‍याच दिवसांपासुन विजेचा सारखा लपंडाव सुरु असल्याने जनता त्रस्त आहे.विद्युत दाब मध्ये चढऊतार होत असतो आणि अपुर्‍या दाबात पुरवठा होत असल्याने विजेची ऊपकरणे निष्कामी ठरत आहे.भर ऊन्हाळ्यात नागरीकांचे जगणे कठीण झाले आहे.अहेरी परिसरातील विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत करा या मागणीसाठी भाजप अहेरीचे पदाधिकारी व नगरसेवक आलापल्ली येथे महावितरणच्या कार्यालयात धडकले. कार्यकारी अभियंता श्री. हेडाऊ साहेब यांची भेट घेऊन पावसाळ्यापुर्वीच वृक्षकटाई करावे,योग्य दाबात सुरळीत विद्युत पुरवठा करावा, अहेरी शहरात विद्युत रोहीत्रांची संख्या वाढवा या मागण्या केल्या.त्यासंर्भात नगर पंचायत अहेरी मार्फत रितसर मागणी सुध्दा करण्यात येईल असे निर्वाचीत पदाधिकार्‍यांनी सांगीतले.

 

 

प्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष श्री संतोष मद्दीवार,शहराध्यक्ष श्री मुकेश नामेवार,नगर पंचायत अहेरीतीच्या भाजप गटनेत्या तथा महीला आघाडीच्या जिल्हा महामंत्री सौ.शालिनीताई पोहणेकर,पाणी पुरवठा सभापती विकास ऊईके,नगरसेविका सौ. दिपाली नामेवार व भाजपचे पदाधिकारी श्री संजय पोहणेकर,श्री मयुर पिपरे इ. कार्यकर्ते ऊपस्थित होते.