भ्याड हल्ल्याचा निषेध आणि तत्परतेने कार्यवाही झाली पाहिजे

85

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

विश्व हिंदू परिषद प्रखंड गडचिरोली

जम्मू काश्मीरमध्ये धार्मिक यात्रेला निघालेल्या हिंदू भाविकांवर माता वैष्णो देवी कटरा येथून शिवखोडी दर्शनाला जात असताना ९ जून रोजी इस्लामिक जिहादी पाकिस्तान पोषित दहशतवाद्यांनी घात लावून शिवखोडीच्या जवळ बसवर अंधाधुंध गोळीबार केला, ज्यामध्ये बस चालकासह १० तीर्थयात्रेकरूंची हत्या झाली. यामुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 

हिंदू तीर्थयात्रेकरूंच्या हत्येच्या विरोधात 18 जून 2024 रोजी बजरंग दल गडचिरोलीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मा. राष्ट्रपतिजींना निवेदन सादर केले. ह्या समाज घातक विकृत प्रवृत्तीवर योग्य वेळेत कडक कार्यवाही झाली पाहिजे हे समाजात एक मत आहे 

या वेळी संपूर्ण देशभरात जिल्हा केंद्रांवर दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हिंदू तीर्थयात्रेकरूं बद्दल श्रद्धांजली अर्पण केली गेली.

या वेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे सुशील हिंगे, रमेश बोधलकर, सचिन ठाकूर, बालाजी भांडेकर, अनूप असाटी, नितीन गवारे, राहुल शेलेदार, राजू भुरसे आदी उपस्थित होते.