- ग्लोबल गडचिरोली न्यूज,
- गडचिरोली, ता. २१ : राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, महिला, तरुण, गरीब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे, असा आरोप करत शुक्रवार (ता. २१) गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने भाजप सरकार विरोधात “चिखल फेक” आंदोलन करण्यात आले.
- महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी, महिला सुरक्षा, खते, बि-बियाण्यांचा काळाबाजार, कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक, चिखलात सुरू असलेली पोलिस भरती, राज्यातील सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत चालवलेली चालढकल, राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. श्रीमंतांची पोरे गोरगरीबांना गाड्याखाली चिरडून मारत आहेत. मुलींचे दिवसाढवळ्या रस्त्यावर खून पाडले जात आहेत. सत्ताधारी पक्षाकडून जाती-धर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सरकारच्या विरोधात जनतेत तीव्र संताप असून सरकारला जाब विचारण्यासाठी भाजप सरकार विरोधात स्थानिक इंदिरा गांधी चौकात भाजप सरकारच्या प्रतिकृती पुतळ्यावर चिखल फेक करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात खासदार डॉ. नामदेव किरसान, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव विश्वजीत कवासे, शहराध्यक्ष सतीश विधाते, तालुकाध्यक्ष वसंत राऊत,अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, चामोर्शीचे तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, गडचिरोली काँग्रेसचे उपाध्यक्ष शंकर सालोटकर, शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय खरवडे, जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, महासचिव देवाजी सोनटक्के, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष संजय चन्ने, रवी मेश्राम, दिवाकर निसार, पुष्पलता कुमरे, अपर्णा खेवले, आशा मेश्राम, ममता मेश्राम, नेताजी गावतुरे, हरबाजी मोरे, कुसुम आलाम, छाया कोवे, पांडुरंग घोटेकर, प्रफुल्ल आंबोरकर, काशिनाथ भडके, श्रीनिवास ताडपल्लीवार, सूरज भांडेकर, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल येलटीवार, घनश्याम मुरवतकर, चारुदत्त पोहाणे, माजीत, ओमप्रकाश डोंगरे, राजेंद्र कुकडकर, बाबूराव गडसूलवार, उमेश उईके, सूरज मडावी, प्रशांत कापकर, अनुप सिकंदर,भरत येरमे, नंदू वाईलकर,हंसराज उराडे, दिगांबर धानोरकर, कल्पक मोप्पीडवार, चंद्रकांत मडावी, सुदर्शन उंदीरवाडे, भैय्याजी मुद्दमवार, नीलकंठ भांडेकर, लतीफ तोरे, टय्या खान, जावेद खान, अविनाश श्रीरामवार यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









