खासदार अशोक नेते यांच्या हस्ते भव्य नारी शक्ती मॅराथॉन ला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ

339

रन फॉर नेशन रन फॉर मोदी

(गडचिरोली ०४ मार्च)

गडचिरोली:आज दि.४/३/२०२४ ला सकाळी ७ वाजता इंदिरा गांधी चौकापासून ते आयटीआय चौक पर्यत नारी शक्ती वंदन आयोजित नारी शक्ती वंदन मॅराथॉन चे भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष गिताताई हिंगे यांच्या नेतृत्वात आयोजन करण्यात आले होते. राष्ट्र निर्माणा मधील नारीशक्तीच्या कर्तबगारीला सलाम करण्यासाठी नारीशक्ती वंदन मॅराथॉन चे आयोजन करण्यात आले होते,तसेच महिला मध्ये आत्मविश्वास वाढविणे व देशासाठी कार्य करण्यास प्रोत्साहित करणे हा उद्देश होता, या मध्ये नवमतदार मुली, महिला बचत गटाच्या सदस्या, एन जी ओ च्या महिला सदस्य बहु संख्येने सहभागी झाल्या. खासदार अशोक नेते यांच्या हस्ते रीतसर उद्घाटन केले व मॅराथॉन ला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. , या मॅराथॉन मध्ये ३०० ते ४०० स्पर्धकांनी भाग घेतला या मध्ये

प्रथम क्रमांक- वैशाली वसंत कोवासे, द्वितिय क्रमांक- ज्ञानेश्वरी बंडू गेडाम, तृतीय क्रमांक-श्रुती सुनील बावणे यांनी पटकावले.

प्रथम बक्षीस ७००१/- रू द्वितीय बक्षीस ५००१/- रू तृतीय बक्षीस ३००१/- रू व प्रोत्साहन पर १०००/- रू चे पाच बक्षीस देण्यात आले तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकांना विशेष गिफ्ट देण्यात आले.आणि हे सर्व बक्षीस वितरण खासदार अशोक नेते यांच्या हस्ते देण्यात आले, मॅराथॉन चे आयोजक खासदार अशोक नेते होते.

या वेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,ज्येष्ठ कार्यकर्ते लोकसभा विस्तारक बाबुरावजी कोहळे, महामंत्री गोविंद सारडा ,महामंत्री प्रकाश गेडाम,महामंत्री योगिता पिपरे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, प्रदेश सदस्य रवी ओल्लालवार, प्रदेश सदस्य कामगार मोर्चा गोवर्धन चव्हाण, दलीत आघाडी अरुण उराडे, सुशील हिंगे, केशव निंबोळ,विनोद देवोजवार,महिला आघाडी जिल्हा महामंत्री त्रिषा डोईजड ,कविता उरकुडे,अर्चना निंबोळ,पुष्पा करकाडे वैष्णवी नैताम,निता उंदिरवाडे, सीमा कन्नमवार, पूनम हेमके,कोमल बारसागडे, स्वाती चंदनखेडे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते