धानोरा ता. ९ : जंगलात चारोळी वेचत असताना रानडुकराने केलेल्या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे.
धानोरा तालुक्यातील मुरूमगाववरून १० किमी अंतरावर असलेल्या अतिसंवेदनशील विभागातील केहकावाही मसाद या गावातील एका युवकावर रानडुकराने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला. हिरामण सावजी वड्डे (वय ३६) असे जखमीचे नाव असून ही घटना मंगळवार (ता. ९) दुपारी ४ वाजता घडली. हिरामण वड्डे जंगलात चारोळी वेचत असतान एका रानडुकराने अचानक त्याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. त्याला डोक्यात, मांडीवर,चेहर्यावर. पाठीवर गंभीर स्वरूपात जखमा झाल्या आहेत. त्याला त्वरीत मुरूमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यास आले. प्राथमिक उपचार वैद्यकीय अधिकारी डाॅ. उमेश धुर्वे व सहयोगी कर्मचारी संगीता चुधरी यांनी केले. तालुकाध्यक्ष लता पूंगाटे व माजी ग्रामपंचायत सदस्य मुनिर शेख यांनी जखमी युवकाची विचासपूस केली.
—————————-









