आयपीएल वर ऑनलाईन सट्टा (जुगार) खेळणा­यांवर अहेरी पोलिसांची मोठी कारवाही.

144

गडचिरोली : दि 29/04/2024

मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल सा. यांनी सद्या देशात आयपीएलचा सीजन सुरु असुन आयपीएलवर सुरु असलेल्या अवैध सट्टाबाजीवर आळा घालुन कठोर कारवाई करण्याचे निर्देश संपूर्ण जिल्हयातील पोस्टे/उपपोस्टे व पोमके यांना दिलेले आहेत.

त्या पाश्र्वभुमीवर दि. 27/04/2024 रोजी पोस्टे अहेरी हद्दीतील आय.पी.एल. सट्टा खेळवणारे इसम बाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. एम. रमेश सा., उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी श्री. अजय कोकाटे सा., पोलीस निरीक्षक पोस्टे अहेरी. श्री. दशरथ वाघमोडे, पोउपनि. जनार्धन काळे, पोउपनि. गवळी व पोलीस स्टॉफ सह विशेष मोहिम राबवुन मौजा अहेरी येथील बालाजी गेस्ट हाऊस येथे छापा मारला असता, बनावटी अॅप nice.7777.fun या प्लॅटफार्मवर ऑनलाईन आय.पी.एल क्रिकेट वर सट्टयाचा खेळ खेळुन इतर लोकांना त्यावर पैसे लावुन नशिब आजमावुन आय.पी.एल सट्टा जुगार खेळ खेळवित असल्याचे दिसुन आले. घटनास्थळावरुन नामे निखील दुर्गेे व आसिफ शेख यांच्या ताब्यातुन चार मोबाईल फोन व भारतीय चलनाचे रोख 9,420/- रु असा मुद्देमाल मिळुन आला.

नमुद दोन्ही आरोपींना विश्वासात घेवुन विचारपुस करुन अधिक चौकशीत असे निष्पन्न झाले की,

नामे इरफान ईकबाल शेख रा. अहेरी याचे अप्पर लाईनला संदिप गुडपवार रा. आल्लापल्ली हा सदरचे रॅकेट चालवत असुन सदर बेकायदेशिर ऑनलाईन आय.पी.एल क्रिकेट वर सट्टयाचा जुगार चालविणारे निखील दुर्गेे व आसिफ शेख हे व्यक्ती एजंट वर्गात मोडतात तसेच त्यांचे (बेस लेवल) खालच्या पातळीवर काम कारणारे निखील गुंडावार, प्रणित श्रीरामवार, अक्षय गनमुकलवार, फरमान शेख, फरदिन पठाण हे सुध्दा आय. पी. एल. सट्टयामध्ये एजंट चे काम करतात.

गुन्हयातील आरोपी नामे 1) निखील मल्लया दुर्गेे, 2)आसिफ फकीर मोहम्मद शेख, 3) धंनजय राजरत्नम