Home मराठी महायुतीचे उमेदवार सुधाकरजी शृंगारे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. आमदार देवरावजी...

महायुतीचे उमेदवार सुधाकरजी शृंगारे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. आमदार देवरावजी होळी

114

निलंगा तालुक्यातील कॉर्नर सभेत आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे मतदारांना आवाहन.

ग्लोबल गडचिरोली न्यूज .

दिनांक ४एप्रिल २०२४

 

भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय महायुतीचे लातूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार खासदार सुधाकर जी शृंगारे यांना पुन्हा मोठे मताधिक्य देऊन निवडून द्यावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी धनेगाव ताडा येथील आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेच्या प्रसंगी केले. रामलिंग शेरे, नामदेव काळे, ब्रम्हानंद भोसले, सखाराम चव्हाण, अनिल राठोड, गुरुनाथ चव्हाण, नामदेव चव्हाण, लक्ष्मण पवार,धनेगाव ताडा येथील समस्त गावकरी उपस्थित होते.