- ग्लोबल गडचिरोली न्यूज,
- दिनांक 15 जून 2024 कोणसरी
कोणसरी येथील मृतक रितिक अंतलवार यांचे नुकतेच अपघाती निधन झाल्याने अंतलवार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिवारातील एकुलता एक कमवता मुलगा गेल्याने परिवाराची मोठी हानी झाली आहे . आपल्या दुःखात आम्ही सगळे सहभागी आहोत असे म्हणत.आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी अंतलवार परीवारातील सदस्यांची भेट घेऊन सांत्वन केले.
यावेळी प्रामुख्याने आई सपना अंतलवार, साक्षी अंतलवार यांच्या परिवारातील सदस्यांसह बंडू बारसागडे, मंगेश पोरटे, राकेश दंडीकवार उपस्थित होते.










