ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १९ : आमदार डॉ. देवराव होळी यांनी यावर्षापासूनच मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी सातत्याने शासनाकडे लावून धरली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून यासंदर्भा २० जून रोजी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मेडीकल काॅलेजच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात आमदार डाॅ. देवराव होळी यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र दिले असता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शैक्षणिक सत्र २०२४-२५ पासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात मुंबई मंत्रालयात २० जून रोजी दुपारी १२ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधिताना दिले असून आमदार डॉ. देवराव होळी यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या बैठकीला आमदार डॉ. देवराव होळी यांच्यासह राज्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, जिल्हाधिकारी, कुलगुरू ,वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता,शिक्षण संचालक, आयुक्त, अधीक्षक अभियंता यासह संबंधित वरीष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
———————————