श्री श्री राधा श्यामसुंदर इस्कॉन मंदिर कृष्णनगर चामोर्शी येथे कार्यक्रमाचे आयोजन.
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
दिनांक २२ जून कृष्णनगर.
श्री श्री राधा श्यामसुंदर इस्कॉन मंदिर कृष्णनगर चामोर्शी च्या वतीने एकदिवसीय चालणाऱ्या भगवान जगन्नाथ बाबा यांच्या गंगा स्नान यात्रेला आमदार डॉ देवराव जी होळी यांनी भेट दिली.
या यात्रेनिमित्त भक्त भाविकांकरिता भजन कीर्तनच कार्यक्रम, आरोग्य शिबीर, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून तीर्थस्थळ मार्कंडा देव येथून १०८ घळा पाणी आणून मूर्तीचे जलाभिषेक करून प्रतिष्ठापीत करण्यात येणार आहे. या भेटीप्रसंगी त्यांनी मंदीरात दर्शन घेवून भक्तांशी संवाद साधला.
भेटी प्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेते जयराम चलाख, विशेष दोशी, प्रतीक राठी , इस्कॉन मंदिराचे पुजारी व भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.