पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे प्रक्षेपण मनोवेधक

120

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ३०: देशाचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ३० जून २०२४ रोजी मन की बात १११ व्या भागाचा कार्यक्रम प्रभाग क्रमांक-५ बुथ क्रमांक -९८ शाहूनगर गडचिरोली येथे माजी खासदार अशोक नेते यांच्या निवासस्थान जनसंपर्क कार्यालयात भाजप पदाधिकारी प्रमुखांसह व कार्यकर्त्यासोबत पाहण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे प्रक्षेपण मनोवेधक, असल्याचे माजी खासदार अशोक नेते यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते म्हणाले.

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये बोलतांना जुलै महिन्यापासून पावसाचे दिवस चालू असतात या पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. याबरोबरच पहाडी एरीया व नदी-नाले या परीसरात राहणारे नागरिक यांनीही खबरदारी बाळगावी. एक पेड़ माँ के नामअंतर्गत पर्यावरण संरक्षणाकरिता सर्वांनी वृक्षारोपण करावे, असे आवाहन करत जलसंवर्धन व जलसंरक्षण करणेसुद्धा जरूरी आहे. तंदुरुस्त व उत्साही जीवन जगण्यासाठी जगात सर्वत्र ठिकाणी योगदिन साजरा केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आभार मानले. यावेळी माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे, जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, भाजप नेते श्याम वाढई, विद्यान बैद्य,तसेच मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.