ट्रक- कारची भीषण धडक; दोघे ठार, तर तीन जखमी

284
  • ग्लोबल गडचिरोली न्यूज,
  • गडचिरोली, ता. १० : नागपूरहून लग्न समारंभ आटोपून कारमध्ये आनंदाने घराकडे परत येत असताना ट्रक आणि कारची जोरदार धडक झाल्याने झालेल्या अपघातात एकाच परीवारातील दोघे जण ठार, तर तिघे जखमी झाले. ही घटना बुधवार १० जुलै रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास नागभीड- ब्रह्मपुरी मार्गावरील पोहार इंटरनॅशनल स्कलजवळ घडली. दिलीप परसवाणी (वय ५५) व महेक जितेंद्र परसवाणी (वय ४२), दोघेही रा. देसाईगंज, जि. गडचिरोली अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात जितेंद्र परसवाणी (वय ४५) आणि त्यांची दोन मुले गौरव परसवाणी (वय १७) व उदय परसवाणी (वय १०) हे जखमी झाले आहेत.
  • देसाईगंज येथील पत्रकार जितेंद्र परसवाणी हे पत्नी महेक, दोन मुले गौरव व उदय आणि नातेवाइक दिलीप परसवाणी यांच्यासह नागपूरला नातेवाइकाच्या विवाहासाठी गेले होते. विवाह समारंभ आटोपून मध्यरात्री परत येत असताना नागभिड-ब्रह्मपुरी मार्गावरील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ त्यांची कार आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. यात दिलीप परसवाणी आणि महेक जितेंद्र परसवाणी हे जागीच ठार झाले, तर जितेंद्र परसवाणी, गौरव परसवाणी व उदय परसवाणी जखमी झाले. तिघांनाही ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, जितेंद्र परसवाणी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना बुधवारी दुपारी नागपूरला हलविण्यात आले.