गडचिरोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची    प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२४-२५  सुरू करा.आमदार डॉ. देवरावजी होळी यांची विधानसभेत मागणी

106

पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून विधानसभेत उचललेला मुद्दा

 

*या सत्रापासून वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित करण्याकरिता आवश्यक बाबींची पूर्तता करून प्रवेश प्रक्रिया सुरू करावी*

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दिनांक १२ जुलै मुंबई

गडचिरोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक सत्र २०२४-२५ पासून सुरू करावी याकरिता शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत परंतु त्यातील काही तांत्रिक अडचणी अजूनही दूर न झाल्याने प्रवेश प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. करिता शासनाने या संदर्भातील असणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करून या शैक्षणिक सत्रापासून प्रवेश प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून केली.

 

गडचिरोली येथे १४ जुलै २०२३ रोजी १०० विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्या संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय यांस शासन निर्णयाने स्थापन करण्यास मंजुरी मिळाली.  त्यानुसार एकूण १९.०९९ हेक्टर जागा अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली यांच्या नावावर करून सातबारा करण्यात आलेला आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचा हस्तांतरण व सामंजस्य करार ३० ऑगस्ट २०२३ रोजी माननीय आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांना सादर करण्यात आलेला आहे.  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने २८ कोटी १० लाख ५८ हजार रुपयांचा बांधकामाचा प्रस्ताव माननीय आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांना सादर करण्यात आलेला आहे. महाविद्यालयासाठी आवश्यक असणारी पदभरती तसेच द्वितीय व तृतीय वर्षात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता आवश्यक इमारत वस्तीगृह इमारत बांधकामांचे प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आलेले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली शैक्षणिक वर्ष २०२४-२५  कार्यान्वित करण्याकरिता आवश्यक तरतूद राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषद नवी दिल्ली यांचे निरीक्षणाकरिता व विविध समस्याबाबत चा प्रस्ताव सचिव वैद्यकीय शिक्षण महाराष्ट्र राज्य व संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्याकडे १९/५/२०२४ रोजी  पाठवण्यात आलेला असून  त्या दृष्टीने समितीद्वारा अंतिम अवलोकन करण्यात आले परंतु अजूनही २०२४-२५ च्या शैक्षणिक सत्रातील प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू आलेली नाही. तरी या सत्रापासून सदर प्रवेश प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी सभागृहात केली