Home मराठी भाजपा कार्यकर्त पदाधिकारी व तालुका वासीयानी केले आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे...

भाजपा कार्यकर्त पदाधिकारी व तालुका वासीयानी केले आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे अभिनंदन

113

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना अखेर यश.

 

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूल मंत्र्यांचे मानले आभार.

 

भाजपा कार्यकर्त पदाधिकारी व तालुका वासीयानी केले आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे अभिनंदन

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

 

दिनांक १५ जुलै २०२४ गडचिरोली

 

अखेर गडचिरोली तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीसाठी शासनाने १२ जुलै च्या शासन निर्णयाद्वारे १७ कोटी ९४ लक्ष ८३ हजार रुपयाची प्रशासकीय मान्यता देत मंजुरी दिली आहे. आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी सातत्यपूर्ण केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून लवकरच तहसील कार्यालयाची भव्य दिव्य इमारत उभी राहणार आहे.

प्रशासकीय इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना अजित दादा पवार व महसूल मंत्री ना .राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहे

 

गडचिरोली तहसील कार्यालयाच्या इमारतीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करून प्रशासकीय मान्यता मिळविण्यात यश मिळाल्याबद्दल आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे गडचिरोली तालुका व शहर भाजपा पदाधिकारी व तालुका वासीयांनी अभिनंदन केले आहे.