Home मराठी लोकसभेच्या पराभवानंतर सतत जनतेच्या सेवेत कायम राहून भाजपा संघटनेचे काम करत...

लोकसभेच्या पराभवानंतर सतत जनतेच्या सेवेत कायम राहून भाजपा संघटनेचे काम करत राहीन…….. मा.खा.अशोकजी नेते. यांचे चामोर्शी शहर व तालुका कार्यकारिणी बैठकीत प्रतिपादन…

116

चामोर्शी शहर व तालुका भाजपा कार्यकारिणी ची संघटनात्मक बैठक सावतेली समाज सभागृह येथे संपन्न…

चामोर्शी शहर व भाजपा तालुका बैठकीत कार्यकर्तेंशी यांच्याशी संवाद साधत मा.राष्ट्रपती जी यांचे लोकसभेतील भाषण,महाराष्ट्र सरकारच्या नुकत्याच झालेल्या बजेट व दिलेल्या योजनावर चर्चा करण्यात आले.

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दि.१५ जुलै २०२४

 

चामोर्शी :-भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी शहर व तालुका भाजपा कार्यकारिणीची संघटनात्मक बैठक सावतेली समाज सभागृह चामोर्शी येथे आज दिं.१५ जुलै २०२४ रोज सोमवारी माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली.

 

यावेळी बैठकिला मंचावर प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक जी नेते,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे, आमदार डॉ. देवराव होळी, ओबिसी मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुरावजी कोहळे,माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी,किसान आघाडीचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे,‌लोकसभा समन्वयक प्रमोद जी पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,जिल्हा महामंत्री सौ.योगिता पिपरे,जिल्हा उपाध्यक्ष डॉ.मिलींद नरोटे, तालुकाध्यक्ष आनंद जी भांडेकर, किसान मोर्चा चे जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे,सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ पिपरे, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री मधुकरजी भांडेकर, जिल्हा सचिव दिलिप चलाख, जिल्हा सचिव साईनाथ बुरांडे, ता.महामंत्री विनोद गौरकर, ता.महामंत्री संजय खेडेकर, बंगाली आघाडी चे नेते सुरेश शहा, ता.महामंत्री काशिनाथ बुरांडे,नगरसेविका रोशनीताई वरघंटे,माजी न्यायाधिश दिक्षित साहेब,दलित आघाडीचे धर्मप्रकाश कुकुडकर, जेष्ठ नेते श्रावणजी सोनटक्के,तसेच मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

चामोर्शी त कार्यकारिणी संघटनात्मक बैठकीला मार्गदर्शन करतांना माजी खासदार यांनी बोलतांना म्हणाले मि जेव्हा आमदार असतांना चामोर्शी अगोदर ग्रामपंचायत होती. त्यावेळी आमचे भाजपाचे जेष्ठ नेते माणिक कोहळे यांच्या पत्नी सरपंच होत्या. तेव्हा या चामोर्शी शहरातील जनतेला शुद्ध पिण्याचा पाणी मिळावा यासाठी सर्व प्रथम पिण्याच्या पाण्याची सोय करून देण्यात माझा सिंहाचा वाटा आहे.विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणारे तिर्थक्षेत्र मार्कंडा देवस्थानचे हि काम मार्गी लागले आहे यासह सुरजागड लोह प्रकल्पाची उभारणी,रेल्वे,चिचडोह,कोटगल बँरेजेस सिंचनाचे प्रश्न,नॅशनल हायवे, असे अनेक कामे लोकसभा क्षेत्रात करण्यात आले आहेत.

विरोधकांनी संविधान व खोट अप्रचार करून मतदारांची दिशाभूल केले.आता पराभवाचे कारणे न शोधता व इथेच न थांबता पुन्हा नव्याने जोमाने पराभवाला खचून न जाता पुढे ही जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणार असे मत माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांनी या कार्यकारिणी संघटनात्मक बैठकीला संबोधित केले.

 

याबरोबरच पुढे बोलतांना चामोर्शी तालुक्यातील भाजपा बैठकीत पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत मा.राष्ट्रपती जी यांचे लोकसभेतील भाषण,महाराष्ट्र सरकारच्या नुकत्याच झालेल्या बजेट व दिलेल्या योजनावर चर्चा करत समस्या समजून घेण्यात आले.आपल्या राजकीय जीवनाचा उपयोग मी आतापर्यंत समाजाच्या सेवेसाठीच केला,पुढे ही जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर राहणार या बैठकी दरम्यान खा.नेते यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मेहनत घेणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्रातील अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न मोदी सरकारच्या कार्यकाळात मार्गी लावण्यात मला यश आले.