मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ” या योजनेच्या मदत कार्यालयाचे शुभारंभ भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयात संपन्न

149

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दि.१६ जुलै २०२४

गडचिरोली :- नुकतेच महाराष्ट्र राज्यातील सरकारने महिलांचा सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली असून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळावा यासाठी गडचिरोली येथे महिलांच्या मदती करिता किंवा कागदपत्राच्या मदत करिता महिला भगिनीं ना धावपळ होऊन त्रास होऊ नये याकरिता भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीता ताई हिंगे यांच्या शुभहस्ते चामोर्शी रोड,आशीर्वाद नगर येथील जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे मदत कार्यालयाचे आज दि.११जुलै २४ रोजी गुरुवारी उद्घाटन करून शुभारंभ करण्यात आले.

या योजनेत २१ ते ६५ वर्षे वयाच्या महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. यासाठी शासन दरवर्षी ४६ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. तरी लाभास पात्र असणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘माझी लाडकी बहीण योजने’चे फॉर्म भरावे. फार्म भरताना महिलांची आर्थिक पिळवणूक होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी.

असे प्रतिपादन भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे यांनी यावेळी उद्घाटन शुभारंभ प्रसंगी केले.

याचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घेण्याचे आवाहन भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे यांनी केले आहे.

 

याप्रसंगी गीताताई हिंगे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी महिला भगिनींचा फार्म स्वतः भरून कामाचा शुभारंभ केला.

यावेळी प्रामुख्याने जिल्हा महामंत्री सीमा कन्नमवार, जिल्हा सचिव वर्षाताई सेडमाके, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष चंदा ताई कोडवते,शहर अध्यक्ष कविताताई उरकुडे, महिला आघाडी सदस्य प्रतिमाताई सोनवणे, भूमिका ताई बरडे , भारती ताई खोब्रागडे तसेच मोठया संख्येने फार्म भरण्यासाठी आलेल्या लाभार्थी महिला भगिनीं उपस्थित होत्या.