आगामी होणाऱ्या विधानसभेच्या तयारीला लागुन भाजपा संघटनेच्या कामाला लागा…. मा.खा.अशोकजी नेते. यांचे धानोरा शहर व तालुका कार्यकारिणी बैठकीत प्रतिपादन…

144

धानोरा शहर व तालुका भाजपा कार्यकारिणी ची संघटनात्मक बैठक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात संपन्न…

—————————————

ग्लोबल गडचिरोली न्यूज

दि.१६ जुलै २०२४

 

धानोरा :-भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्राची धानोरा शहर व तालुका भाजपा कार्यकारिणीची संघटनात्मक बैठक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात धानोरा येथे आज दिं.१६ जुलै २०२४ रोज मंगळवारी माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांच्या नेतृत्वातील अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

 

यावेळी बैठकि ला मंचावर प्रामुख्याने माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक जी नेते,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे, आमदार डॉ. देवराव होळी, ओबिसी मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुरावजी कोहळे,माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी,किसान आघाडीचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे,‌लोकसभा समन्वयक प्रमोद जी पिपरे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,डॉ. नितीन कोडवते,डॉ. चंदाताई कोडवते, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.मिलींद नरोटे,तालुकाध्यक्षा सौ.लताताई पुन्घाटे,कृ.उ.बा.स. सभापती तथा माजी तालुकाध्यक्ष शशिकांत साळवे,माजी जिल्हाध्यक्ष तथा भाजपा नेते साईनाथ साळवे, ता.महामंत्री विजय कुमरे,माजी पं.स.सभापती मारोतराव ईचोळकर, शहराध्यक्ष सारंग साळवे,तसेच मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

माजी खासदार अशोकजी नेते यांनी धानोरा कार्यकारिणी संघटनात्मक बैठकीला मार्गदर्शन करत म्हणाले आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांना अगोदर बोलण्याची संधी देण्यात आली.यात कार्यकर्त्यानी आपआपले मनोगत व्यक्त करतांना लोकसभेच्या झालेल्या पराभवाची कारणमिमांसा सांगत झालेल्या चुकीचे चिंतन करत विचार मंथन केले. यावर विचार मंथन करत मा.खा.नेते यांनी कार्यकर्त्यांना झालेल्या पराभवाची कारणे सांगत जय पराजय होणे साहजिकच आहे. जरी माझा पराजय झाला असेल तरी आपण कार्यकर्ते निराश न होता नवचैतन्य, उत्साह व आत्मविश्वासाने येणाऱ्या विधानसभेच्या कामाला लागावे,व भाजपाच्या संघटनेकडे लक्ष वेधुन जोमाने काम करावे. असा संदेशात्मक आवाहन देत आपल्या राजकीय जीवनाचा उपयोग मी आतापर्यंत समाजाच्या सेवेसाठीच केला,पुढे ही जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर राहणार या बैठकी दरम्यान मा.खा.नेते यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मेहनत घेणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्रातील अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न मोदी सरकारच्या कार्यकाळात मार्गी लावण्यात मला यश आले.

असा सल्ला देत न थांबता पुन्हा नव्याने जोमाने संघटनेच्या कामाला लागावे.असे मत माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते यांनी या कार्यकारिणी संघटनात्मक बैठकीला संबोधित केले.

 

यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करत लोकसभेत झालेल्या पराभवाची समिक्षेवर चिंतन मंथन केले.