- आमगाव व कोणसरी आणि रेगडी प्रा. आ. केंद्र आणि हळदवाही उपकेंद्र येथे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी दिली भेट
आमगाव प्रा. आ. केंद्र येथे वाढीव निवासगृह साठी शासन दरबारी पाठपुरावा करणार
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
दि. 18 जुलै 2024 चामोर्शी
चामोर्शी : तालुक्यातील आमगाव व कोणसरी व रेगडी प्रा. आ. केंद्र आणि हळदवाही उपकेंद्र येथे भेट दिली असता पावसाच्या दूषित पाण्याने आजार पसरतात. ऐन पावसाळ्यात कधी ऊन, कधी पाऊस तर कधी थंडी या बदलत्या हवामानामुळे पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप हे आजार डोके वर काढतात. त्यामुळे पावसाळ्यात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. याप्रसंगी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी आरोग्य अधिकारी व कर्मचारी सतर्क राहून नागरिकांना योग्य मार्गदर्शन करावे अशी सूचना केली
यावेळी वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांच्या सह बंगाली आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, अंशुल दासरवार उपस्थित होते









