आनंदग्राम येथील फुटबॉल प्रतियोगितेचे सौ. बिनाताई होळी यांच्या हस्ते बक्षीस वितरण
श्री श्री गणेश स्पोर्ट असोसिएशन आनंदग्राम तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली द्वारा फुटबॉल प्रतियोगितेचे आयोजन
ग्लोबल गडचिरोली न्यूज,
दिनांक 12 ऑगस्ट 2024 चामोर्शी
*चामोर्शी तालुक्यातील मौजा आनंदग्राम येथे श्री श्री गणेश स्पोर्ट असोसिएशन आनंदग्राम तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली द्वारा फुटबॉल प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ग्रामीण क्षेत्रामध्ये फुटबॉल सारखी मोठी प्रतियोगिता भरवून लोकांमध्ये फुटबॉल बद्दल उत्साह निर्माण करणाऱ्या आयोजकांचे काम खरोखरच कौतूकास्पद असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या सौभाग्यवती बिनाताई होळी यांनी आनंदग्राम येथील फुटबॉल प्रतियोगितेच्या बक्षीस वितरण प्रसंगी केले.*
*यावेळी प्रामुख्याने उपस्थित माधवी ताई पेशट्टीवार, मल्लिक सर, विमल रॉय, बिमल मंडल, मनोज दास, विश्वनाथ सरकार तसेच आयोजक मंडळाचे सदस्य व विजेता व उपविजेता संघांचे खेळाळू व ग्रामस्थ उपस्थित होते*