भारतीय जनता पार्टी ची संघटन बैठक शासकीय विश्रामगृह कॉम्पलेक्स ,गडचिरोली येथे संपन्न.

57
  • ग्लोबल गडचिरोली न्यूज
  • गडचिरोली ,दिं. २७ ऑगस्ट २०२४

भारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्हा लोकसभा क्षेत्राची विस्तारित भाजपा कार्यकारिणी व भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आघाड्यांसह संघटनात्मक बैठक शासकीय विश्रामगृह काँम्पलेक्स गडचिरोली येथे अनुसुचित जाती/जनजाती सांसदीय समितीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री _मान.श्री. फग्गनसिंह कुलस्ते, यांच्या अध्यक्षतेतील मार्गदर्शनात व _माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे ,_ यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.

 

या बैठकीला माजी खासदार अशोकजी नेते यांनी बोलतांना आगामी येणाऱ्या विधानसभेत विजयाचा संकल्प करत संघटनेचे कार्य,बुथ रचना,यात कार्यकर्ते यांनी लक्षकेंद्रित करून काम करावे.लोकसभेत झालेल्या पराभवाला खचून न जाता, कुठल्याही पद्धतीचा वादविवाद न करता किंवा हेवेदावे न करता संघटनेचे काम करावे असे व्यक्तव्य याप्रसंगी केले.

 

यावेळी प्रामुख्याने म्हणून आमदार डॉ.देवरावजी होळी, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे,जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,‌जिल्हा महामंत्री गोविंद जी सारडा, जिल्हा महामंत्री सौ. योगिता पिपरे,लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे,जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी आघाडी जिल्हा प्रभारी डॉ.मिलिंद नरोटे,किसान मोर्चा चे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, महिला आघाडी च्या प्रदेश चिटणीस सौ. रेखाताई डोळस, महिला आघाडी च्या जिल्हाध्यक्षा सौ.गिताताई हिंगे,जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणयजी खुणे,डॉ. चंदाताई कोडवते, तालुकाध्यक्ष विलास पा. भांडेकर, तालुकाध्यक्ष लताताई पुन्घाटे,तालुकाध्यक्ष संजय सरकार,शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहराध्यक्ष सोपान नैताम,शहराध्यक्ष सारंग साळवे, जिल्हा सचिव रंजिता कोडाप, जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, शहराध्यक्ष कविता उरकुडे, तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.