Home मराठी आमदार डॉ देवरावजी होळी यांचे घरी बाप्पाचे आगमन विधीवत पूजा करून...

आमदार डॉ देवरावजी होळी यांचे घरी बाप्पाचे आगमन विधीवत पूजा करून जनतेच्या कल्याणाची केली कामना

143

गणेश चतुर्थीच्या समस्त जनतेला दिल्या शुभेच्छा

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

दिनांक ७ सप्टेंबर गडचिरोली

 

चामोर्शी : गणेश चतुर्थी या निमित्त आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे घरी श्री गणेशाचे आगमन झाले असून या प्रित्यर्थ पत्नी सौ बिनाराणी होळी यांचेसह श्री गणेशाची विधिवत पूजा केली. आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी सुखकर्त्याने जिल्ह्यातील जनतेच्या दुःखाची हरण करून सुखी व समृद्ध करावे अशी कामना श्री गणरायाला केली.यावेळी त्यांनी गणेश चतुर्थी निमित्त जिल्ह्यातील समस्त जनतेला शुभेच्छा दिल्या.

 

याप्रसंगी परिवारातील सदस्यासह सुभाष सरकार, आदित्य सरकार, दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, जैराम चलाख, सुरेश शहा, यश गण्यारपवार, दीपक वासेकर, सुमित सरकार, राकेश भैसारे, सुनील सोरते, अनिल प्रिसिंगलवार, दिलीप नैताम, उपस्थित होते