- ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. १० : जिल्ह्यात पावसाने कहर केला असून भामरागड, सिरोंचा तालुक्यासह अनेक भागांतील मार्ग बंद झाले आहेत. कित्येक गावांचा संपर्क तुटला आहे. मात्र जिल्हा प्रशासन परीस्थिती नियंत्रणात आण्याचे कसोशिचे प्रयत्न करत असून बचाव पथकाने पुरात अडकलेल्या अनेक नागरिकांना सुखरूप बाहेर काढले आहे. मंगळवार (ता. १०) दुपारी १२ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार पुरामुळे जिल्ह्यातील आलापल्ली-भामरागड रस्ता राष्ट्रीय महामार्ग (पर् कोटा नदी), (कुडकेली नाला) व (चंद्रा नाला)(पेरमिली नाला)ता. भामरागड, निजामाबाद-सिरोंचा जगदलपुर एनएच ६३ ( सोमनपल्ली पुलाचे Approches पाण्याखाली) ता. सिरोंचा, कोरची-बोटेकसा रस्ता राज्यमार्ग(भिमपुर नाला)ता. कोरची, मारीगुडम पोचमार्ग ता. सिरोंचा, देचलीपेठा- कोपेला- सोमनपल्ली ग्रामीण रस्ता, कर्जेली जवळ, ता.सिरोंचा, राजाराम-मरनेली ग्रामीण रस्ता ता. अहेरी, अहेरी- देवलमारी- मोयाबिनपेठा रस्ता राज्यमार्ग (वट्रा नाला) ता. अहेरी, भामरागड धोंडराज कवंडे राज्यमार्ग (जुवी नाला) ता.भामरागड, भामरागड-आरेवाडा रस्ता ता. भामरागड, एटापल्ली ते गट्टा रस्ता (जांबिया नाला) ता. एटापल्ली, देचलीपेठा-येलाराम ग्रामीण रस्ता, रोंदावाही ते मुरगाव ग्रामीण रस्ता, चुडीयाल ग्रामीण रस्ता असे अनेक रस्ते बंद आहेत. गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे तसेच येवा वाढल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाच्या विसर्गामध्ये आवश्यकता भासल्यास टप्प्याटप्प्याने ७५०० ते ८००० क्युमेक्सपर्यंत वाढ करण्यात येईल. त्यामुळे नदीपात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान भामरागड येथील मौजा धुळेपल्ली येथील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकीवरून तोल जाऊन दोघे जण वाहत जाऊन झाडावर अडकले असताना त्यांना तेथून बाहेर काढण्यात आले. भामगराड येथील एका महिलेस प्रसूतीत रक्तस्त्रााव होत असल्याने वैद्यकीय आपत्ककालीन स्थिती उद्भवली असता त्यांना तत्काळ वैद्यकीय उपचार करण्यात आले. सिरोंचा तालुक्यातील सोमनुर येथे पाण्यामध्ये कार अडकली होती. या कारमधून ४ व्यक्तींना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले.भामरागड तालुक्यातील दोन गंभीर रुग्णांना पुराच्या पाण्यातून बोटीच्या साहाय्याने बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. भागरागड शहरातील पुराचे पाणी वाढल्याने तेथील अंदाजे २०० नागिरकांना स्थानिक बचाव पथकाच्या मदतीने फुड पॅकेट व पिण्याचे पाणी पुरवण्यात आले. जिल्ह्याच्या दक्षिणेत असलेल्या भामरागड, सिरोंचा या दोन तालुक्यांत पूरस्थिती गंभीर दिसून येत आहे. भामरागड शहरात पुराचे पाणी कालच्यापेक्षा थोडे आणखी वाढले आहे. वाढ गती तुलनेने हळू असू २०१९ च्या पुरपेक्षा पातळी कमी आहे. नदीकिनारी विशेषतः अतिक्रमित घरांमध्ये पाणी शिरले आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची कार्यवाही स्थानिक प्रशासनाकडून सुरू आहे. काही नागरिक त्यांचे नातेवाईक/शेजारी यांच्याकडे तर काही हे आपल्या घरांच्या दुसऱ्या माळ्यावर स्थलांतरीत झाले आहेत. २०१९ च्या तुलनेत नदीकाठावरील दुर्गम गावांमध्ये घरात पाणी जाऊन धोका झाल्याची तूर्तास तरी माहिती प्राप्त नाही. आयटीआय रोड, शोभनगर भागामध्ये पाणी आले आहे. सिरोंचा तालुक्यातील करजेली गावात पुराचे पाणी कालच्यापेक्षा थोड आणखी वाढलेले आहे. वाढ गती तुलनेने हळू आहे. येथील आपदामित्र संदीप आत्राम यांनी गावातील २८ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले. कोरला गावाजवळ पाणी आले आहे. सोमनपल्ली परीसरामध्ये बॅक वॉटरचे पाणी आले आहे. गोसीखुर्द प्रकल्पाचे पाणी सोडण्यात येत असल्याने पूरस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ———————————-चा कहर; अनेक मार्ग बंद