- ग्लोबल गडचिरोली न्यूज,
दिं.२४ आक्टोंबर
चिमूर-७४, विधानसभा निवडणूक २०२४ भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचा नामांकन अर्ज भरण्यासाठी नेहरू विद्यालय, चिमूर ते प्रशासकीय भवन (तहसील कार्यालय, चिमूर) पर्यंत आयोजित ‛भव्य नामांकन महारॅली’ त माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तसेच सहसंयोजक विधानसभा निवडणूक संचालन समिती महाराष्ट्र राज्य अशोकजी नेते यांनी प्रचंड हजारोंच्या संख्येत काढलेल्या महारँली च्या जनसमुदायात सहभागी व उपस्थित होऊन नामांकन दाखल केले.
यावेळी भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया,माजी विधान परिषद सदस्य मितेशजी भांगडीया, श्रीकांत जी भांगडीया,भाजपा नेते तथा ओबीसी मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष राजुभाऊ देवतळे, भाजपाचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ.दिलिप शिवरकर, जेष्ठ नेते जितेंद्र मोटघरे तसेच महायुतीचे सन्माननीय नेते व हजारोंच्या संख्येनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.