शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याचा मृतदेहच तलावात दिसला

198

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. १० : देसाईगंज तालुक्यातील चोप शेतावर गेलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा मृतदेहच तलावात आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. संजय शंकर करपते (वय ३८) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

संजय करपते हा सोमवारी पहाटेपासून शेतात धानपिकांना पाणी देण्यासाठी घरून गेला होता. पण दुपारी १ वाजता अचानकत्याचा मृतदेह चोप शिवारातील पाटलीन तलावात तरंगताना येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना दिसला. या घटनेची माहिती लगेच देसाईगंज पोलिस स्टेशन येथे देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. पोलिस स्टेशनचे ठाणेदार अजय जगताप यांच्या मार्गदर्शनात या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. संजय करपते हा विवाहित असून त्याच्या मागे पत्नी, मुलगा व आई असा परीवार आहे. वृत्त लिहीपर्यंत त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही.

——————————