Home Gadchiroli आष्टीत घडली भयानक घटना… दिव्यांगाचा गळा चिरून खून

आष्टीत घडली भयानक घटना… दिव्यांगाचा गळा चिरून खून

179

ग्लोबल गडचिरोली न्यूज

गडचिरोली,ता.१६: चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे भाड्याने राहणाऱ्या एका दिव्यांग इसमाची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी(ता.१५) उघडकीस आली. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी घराला कुलूप लावून पसार झाले आहेत. रशीद अहमद शेख (वय ६०) असे मृताचे नाव असून ते नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील मूळ रहिवासी होते.

प्राप्त माहितीनुसार रशिद शेख यांनी १२ डिसेंबरला बुटीबोरी येथील नातेवाईकांना गावाकडे येतो, असे मोबाईलवरुन सांगितले होते. परंतु तीन दिवस लोटूनही ते पोहचले नाही. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना फोन केला. परंतु फोन बंद होता. त्यामुळे शंका आल्याने नातेवाईक आष्टीत पोहचले. त्यांनी घरी जाऊन बघितले असता खोलीला कुलूप होते. खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर त्यांना रशिद शेख यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. त्यांचा गळा आणि पोटावर धारदार शस्त्राने वार केल्याचे आढळून आले.

पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख यांचा खून कोणी आणि कशासाठी केला, याविषयी पोलिस तपास करीत आहेत. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

——————————