ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली, ता. २७ : बुलडाणा जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या वरीष्ठ बॉक्सिंग राज्यस्तर अजिंक्यपद स्पर्धेत गडचिरोली जिल्हा बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचा खेळाडू पारस हरीदास राऊत याने ७५ ते ८० किलो वजनगटात कांस्य पदक पटकावले.
रोगाव येथे झालेल्या वरीष्ठ बॉक्सिंग राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत पारस राऊतने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कांस्य पदक प्राप्त केले. या स्पर्धेच याच प्रशिक्षण केंद्रातील आकाश यादव कुनघाडकर, लोमन काम्ताप्रसाद चनाप यांचाही सहभाग होता. त्यांच्या यशाबद्दल जिल्हा क्रिडाधिकारी घटाळे, प्रशिक्षक यशवंत कुरूडकर, पंकज मडावी, संतोष गैनवार, महेश निलेकार, जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे जगदीश मस्के, प्रवीण मेश्राम, अनिल निकोडे, रजत देशमुख, संजय मानकर, निखिल इंगळे, सूरज खोब्रागडे, राउटीअन्स जिम मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे.
————————————










