Home Gadchiroli देसाईगंज पोलिसांनी आवळल्या गोवंश तस्करांच्या मुसक्या

देसाईगंज पोलिसांनी आवळल्या गोवंश तस्करांच्या मुसक्या

106

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २८: जिल्ह्यातील गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतुक करणाऱ्यांवरकठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिले आहेत. या अनुषंगाने मंगळवार (ता. २८) रात्रीच्या सुमारास दोन वाहनांमध्ये जनावरे अवैधरित्या भरून जाणारी दोन वाहने देसाईगंज पोलिसांनी जप्त केले.

देसाईगंज ते जुनी वडसा रोडने गोवंश तस्करीची वाहने जाणार आहेत, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंज पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वात पोलिस पथकाने जुनी वडसा रोडवरील पोपटी लॉनजवळ सापळा रचला. देसाईगंज ते जुनी वडसा रोडवर दोन वाहने संशयितरित्या येताना दिसून आले. त्यावेळेस रोडवर तात्पुरता अडथळा निर्माण करून दोन्ही वाहनांना थांबवून वाहनांची तपासणी केली असता दोन्ही वाहनांमध्ये गोवंश जनावरे अतिशय निर्दयतेने कोंबुन भरले असल्याचे निदर्शनास आले. वाहन क्रमांक एमएच ४० सी.डी. ८६४९ अशोक लेलँड टाटा कंपनीची ज्याचा चालक प्रणय राजेंद्र बुल्ले (वय २१) रा. देऊळगाव, ता. ब्रह्मपूरी, जि. चंद्रपूर याच्या वाहनात ५ बैल, प्रति बैल विक्री किंमत २० हजार, त्याचप्रमाणे वाहन क्रमांक एम. एच. ३६ ए. ए. ००७६ बोलेरो पिकअप वाहन ज्याचा चालक राजेश सोमेश्वर बावनकर ( वय २४) रा. वेळवा, ता. पवनी, जि. भंडारा याच्या ताब्यातील वाहनात ७ बैल प्रति बैल विक्री किंमत अंदाजे १५ हजार रुपये अशी एकूण दोन्ही चारचाकी वाहनात १२ गोवंशीय जनावरे ज्यांची एकूण किंमत २ लाख ५ हजार रुपये १२ गोवंशीय जनावरे व दोन चारचाकी वाहन अंदाजे एकूण किंमत १३ लाख ७५ हजार असा एकूण १५ लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी सचिन मधुकर बावनथळे ( वय २५) रा. येंगलखेडा, ता. कुरखेडा जि. गडचिरोली (बैल मालक), प्रणय राजेंद्र बुल्ले ( वय २१) रा. देऊळगाव, ता. ब्रह्मपूरी जि. चंद्रपूर, राजेश सोमेश्वर बावनकर ( वय २४) रा. वेळवा, ता. पवनी, जि. भंडारा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनात देसाईगंजचे प्रभारी अधिकारी अजय जगताप यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार विनोद बोगा, पोलिस हवालदार राजू उराडे व पोलिस अंमलदार अजय दुर्गम यांनी केली.

—————————