महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

125

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १२ : मुंबई येथील विधानभवनात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री तसेच आपल्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद् फडणवीस यांची भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत भेट घेऊन त्यांचा भारतीय जनता पक्ष महिला मोर्चातर्फे शाल व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा देऊन सन्मान केला. यावेळी गडचिरोलीच्या भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे तसेच महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष व प्रदेश पदाधिकारी उपस्थित होत्या.