राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी तनुश्री आत्राम

138

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २० : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार व प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या मान्यतेने गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांनी तनुश्री आत्राम यांना पाठवले आहे. पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची सर्व ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यत पोहचविण्यासाठी पक्षाला सहकार्य राहील, असा विश्वास व्यक्त केला आहे. या नियुक्तीबद्दल गडचिरोली जिल्ह्यातील तमाम राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून तनुश्री आत्राम यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.