गडचिरोलीत अधीक्षक दिलीप मेश्राम यांना निरोप

148

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. २ : कार्यालय वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक), गडचिरोली येथील अधीक्षक दिलीप मेश्राम यांना नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने जिल्ह्यातील खासगी शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी यांनी अनोखा पद्धतीने त्यांची बॅग्गीतून मिरवणूक काढून निरोप दिला.

गडचिरोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर सेवक संघ, गडचिरोली यांनी आयोजित केलेला हा सेवापूर्ती सोहळा संसस्मरणीय ठरला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष दंडकारण्य शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, शिक्षण उपसंचालक उल्हास नरड,.शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे, राज्य शिक्षकेतर कर्मचारी महामंडळाचे कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर, अबुझमाड शिक्षण मंडळाचे सचिव शमशेर खाँ पठाण, कमलताई मुनघाटे हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्मिता लडके, विद्याभारती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डाॅ. वंदना मुनघाटे, सत्कारमूर्ती दिलीप मेश्राम, जिल्हाध्यक्ष अशोक काचिनवार, जिल्हा कार्यवाह उदय धकाते, उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे, वैभव बारेकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी उल्हास नरड म्हणाले की, या जिल्ह्यात योग्य व्यक्तीचा अनोखा निरोपीय कार्यक्रम प्रथमच होत आहे. मान, सन्मान, निष्ठा, प्रतिष्ठा हे त्यांच्या कर्तृत्वावर निर्माण होते. याचे उदाहरणं दिलीप मेश्राम आहेत. प्रतिष्ठा ही अधिकाऱ्यामुळे नाही तर खालच्या कर्मचाऱ्याच्या कामामुळे त्यांचा सन्मान केला जातो. गडचिरोली जिल्ह्याला मी सोडले नाही. या जिल्ह्याकडे माझे विशेष लक्ष असते, असेही ते म्हणाले. आमदार सुधाक अडबाले म्हणाले कीं, मी नागपूर विभागाचा जवळपास दोन वर्षापासून शिक्षक आमदार आहे. मला सत्कार मूर्ती दिलीप मेश्राम यांना शिक्षक कर्मचारीकरिता कधीच फोन किंवा पत्र देण्याची संधी त्यांनी दिली नाही. ते स्वतः सर्वांचे काम करून देत होते. त्यांच्या कार्यालयात आलेला निधी कधीच त्यांनी वापस जाऊ दिला नाही. असे ते कर्तव्यदक्ष अधिकारी दिलीप मेश्राम हे आहेत. राज्यातील हे पहिले वेतन पथकाचे अधिकारी आहेत की, ज्यांचा निरोप भव्य मिरवणूक काढून शिक्षकेतर संघटनेने एक आदर्श निर्माण केला आहे. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे म्हणाले की, वाजत-गाजत अशी बग्गीतून मिरवणूक काढून त्यांना सभास्थळी आणणे, अशी संधी कोणत्याही अधिकाऱ्यांना आजपर्यंत मिळाली नाही. असे अधिकारी जिल्ह्याला मिळणे आवश्यक आहे. त्यांनी महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण केला आहे, असेही ते म्हणाले. यावेळी इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. संचालन उदय धकाते, तर आभार संदीप भरणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी नंदलाल लाडे, संघमित्रा भशारकर, रुषी वासेकर, शैलेश कापकर,अरुण धोडरे, भूपेश वैरागडे, हेमंत रामटेके आदींनी सहकार्य केले..कार्यक्रमाला समस्त तालुका पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.