वेगवान दुचाकी झाडाला धडकून तीन तरुणांचा जागीच म

469

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली,ता. १७ : चामोर्शी तालुक्यातील घोट पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील सुभाषग्राम – घोट मार्गावरील ठाकूरनगर पहाडीजवळ भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन झाडाला धडक बसल्याने दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार (ता. १७)सकाळी ९.३० ते १० वाजताच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे झाडाला धडक बसल्याने दुचाकी अचानक पेट घेत जळून खाक झाली. तसेच अपघातातील मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. साहेब सुभाशीष चक्रवर्ती ( वय १६), सौरभ सुभाशीष चक्रवर्ती ( वय २०) दोघेही रा. वसंतपुर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली, विशाल भूपाल बच्छाड ( वय १९)रा. १० नंबर, शिरपूर, तेलंगणा, अशी मृतांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार वसंतपुर येथील साहेब चक्रवर्ती, सौरभ चक्रवर्ती या दोन भावंडासह त्यांचा तेलंगणा येथील येथील नातेवाईक विशाल बच्छाड हे तिघे जण वसंतपूर येथून घट कडे दुचाकीने जात असताना ठाकूरनगर पहाडी जवळील वळणाजवळ भरधाव दुचाकी अनियंत्रित झाली व थेट सागवान झाडाला आदळली. या धडकेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. दुचाकीही जळून खाक झाली. विशाल बच्छाड हा दुचाकी चालवत असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच घोट पोलिस मदत केंद्राचे पोलिस निरीक्षक नीतेश गोहणे यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. तिघांचेही मृतदेह चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. घटनेचा पुढील तपास घोट पोलिस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार नीतेश गोहणे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. एकाच कुटुंबातील दोन भावांचा असा दुर्दैवी मृ्त्यू झाल्याने चकवर्ती परीवार शोकमग्न झाला आहे.