भाजप महिला मोर्चातर्फे पाणपोईचे उद्घाटन

100

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २ : भारतीय जनता पक्ष महिला मोर्चातर्फे २ मे २०२५ रोजी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.

तहानलेल्याला घोटभर पाणी पाजणे ही आपली संस्कृती आहे. रस्त्याने जाणारे पांथस्थ, भाजीवाले, मजूर वर्ग घशाला पडलेली कोरड दूर करताना चार घोट गार पाणी घशाखाली उतरले, की त्यांना हायसे वाटते. या जाणीवेतून ही पाणपोई भाजप महिला मोर्चा गडचिरोलीच्या अध्यक्ष गीता हिंगे यांच्या वतीने स्थानिक गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील पोस्ट ऑफिसच्या बाजूला सुरू करण्यात आली. पाणपोई उद्घाटन प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुशील हिंगे,भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, शहराध्यक्ष अनिल कुनघाडकर, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री सीमा कन्नमवार ,जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, प्रतिमा सोनवणे, भूमिका बर्डे, सुनीता आलेवार ,रणछोड कलंत्री,अविनाश विश्रोजवार, विनोद देवोजवार, नंदेश्वर,आलमपटलावार, दीपक जाधव तसेच भाजप कार्यकर्ते व महिला मोर्चाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

—————-