Home Gadchiroli व्हॉलीबॉलचा खेळ झाला, भावी डॉक्टरांचा जीव गेला

व्हॉलीबॉलचा खेळ झाला, भावी डॉक्टरांचा जीव गेला

158

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ११ : वैनगंगा नदीपात्रात अंघोळीला गेलेल्या येथील नव्यानेच सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी असलेल्या भावी डॉक्टरांना नदीत पाणी तसे कमी असल्यामुळे “व्हॉलीबॉल ” खेळण्याचा मोह झाला आणि या मोहामुळेच त्यांचा जीव गेल्याचे निष्पन्न झाले आहे. गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तीन भावी डॉक्टरच्या मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली आहे. रविवार (ता. ११) सकाळी ९. वाजताच्या सुमारास सर्व मृतदेह शोधण्यात पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या चमुला यश आले.

शनिवार (ता. १०)10 हा दिवस गडचिरोलीच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी काळा दिवस ठरला. या दिवशी सुट्टी असल्याने येथील ” एमबीबीएस ” च्या प्रथम वर्षात शिकत असलेले ८ भावी डॉक्टर दुपारच्या सुमारास जवळच असलेल्या वैनगंगा नदीवर अंघोळीसाठी गेले होते. चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीत येत असलेल्या या नदीच्या पात्रात तसे पाणी कमी असल्याने ” व्हॉलीबॉल ” खेळण्यासाठी सर्व विद्यार्थी नदी पात्रात उतरले. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ५ जण बुडू लागले. त्यातील दोघांनी कसाबसा आपला जीव वाचवला, पण तिघे बुडाले. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याची खोली अधिक असल्याने प्रयत्न निष्फळ ठरले. शनिवारी अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले होते. रविवारी सकाळी त्यांचे मृतदेह शोधण्यात आले.