ईल्लूर येथे बाभळीवर वीज कोसळताच नऊ बकऱ्यांचा मृत्यू

120

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. २२ : आष्टी परीसरातील ईल्लूर येथे शेतातील एका बाभळीच्या झाडावर वीज कोसळली. त्यामुळे त्या झाडाखाली आश्रयाला असलेल्या नऊ बकऱ्या जागीच ठार झाल्या. या घटनेची माहिती महसूल अधिकाऱ्यांना मिळताच तलाठी सचिन गुरनुले यांनी घटनास्थळी धाव घेतली. पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून पंचनामा करून अहवाल शासनाला पाठवण्यात आला आहे. या बकऱ्यांपैकी ठाकरी येथील राजन्ना पेरमवार यांच्या चार, राजू जिल्लेवार एक, सदाशीव बोलगोडवार दोन, बाबूराव वर्धलवार यांच्या दोन बकऱ्या होत्या. मृत बकऱ्याच्या पशुपालकांना शासनामार्फत तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे