ग्लोबल गडचिरोली न्यूज,
गडचिरोली,ता .७ : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) केवळ गडचिरोली जिल्हा हरित बनवत नाही तर ‘ग्रीन स्टील’चे भारतीय स्वप्न साकार करण्यासाठी काम करत आहे. सोबतच आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या जीवनातील आनंद निर्देशांक देखील वाढवत आहे. शुक्रवारी गडचिरोली पोलिसांच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत गडचिरोली पोलिस मुख्यालयातील पांडू आलाम सभागृहात विवाह समारंभ संपन्न झाला. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एलएमईएल च्या उपक्रमाचे कौतुक केले . मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, गडचिरोली जिल्ह्याचे सह-पालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री बी. प्रभाकरन, आमदार धर्मरावबाबा आत्राम आणि डॉ. मिलिंद नरोटे, डीआयजी (नक्षलविरोधी अभियान) श्री अंकित गोयल, गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक श्री नीलोत्पल आणि इतर मान्यवर शुक्रवारी गडचिरोलीतील पांडू आलाम सभागृहात आयोजित आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या विवाह सोहोळ्याप्रसंगी उपस्थित होते. शुक्रवारी लग्न झालेल्या आत्मसमर्पित नक्षलवाद्यांपैकी . अर्ध्याहून अधिक जणांना एलएमईएलमध्ये नोकरी देण्यात आली आहे. एलएमईएलने आतापर्यंत एकूण ६५ आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना सन्मानाची नोकरी दिली आहे.
शुक्रवारी गडचिरोली येथे संपन्न झालेल्या ऐतिहासिक सामूहिक विवाह सोहळ्यादरम्यान, एलएमईएलने नवविवाहित जोडप्यांना ‘मंगळसूत्र’ गृहोपयोगी वस्तू देऊन सदर समारंभाला पूर्ण समर्थन दिले. एलएमईएलच्या लोक सक्षमीकरणच्या धोरणाला अनुरूप हा उपक्रम होता. गडचिरोलीत आयोजित सी-६० जवानांच्या सत्कार प्रसंगी बोलताना श्री. फडणवीस म्हणाले, “मी लॉयड्स मेटल्सचं अभिनंदन करेन कि त्यांनी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना प्रशिक्षित करून त्यांना रोजगार दिला जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढला. एकीकडे महाराष्ट्र शासनाचे नक्षल आत्मसमर्पण संदर्भात धोरण तर आहेच, पण दुसरीकडे लॉयड्स सारखे उद्योग त्यांच्या पुनर्वसनाला हातभार लावत आहेत. पुढच्या काळात आपल्याला गडचिरोली जिल्हा हा स्टील हब म्हणून तसेच रोजगार-युक्त जिल्हा बनवायचा आहे.
एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन म्हणाले, “समान संधी देणारा नियोक्ता म्हणून, आत्मसमर्पण करणाऱ्या ६५ नक्षलवाद्यांना एलएमईएलने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. एलएमईएल पूर्व महाराष्ट्रात एक मोठा परिवर्तनकारी प्रकल्प उभारत आहे. एलएमईएलने या आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांच्या जीवनात एक नवीन पहाट आणली आहे. आम्ही त्यांच्या आनंदात सहभागी आहोत.” श्री. बी. प्रभाकरन ह्यांचा समग्र विकासात्मक दृष्टिकोन आणि आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांचे एक प्रकारे स्वीकारलेले पालकत्व ह्याचेच हे द्योतक आहे.
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांपैकी एक असलेल्या असिनला अजूनही त्याच्या नक्षलवादी जीवनातील अनिश्चितता आणि चिंता आठवतात. त्याच्यासारखेच इतरही आहेत ज्यांच्या भूतकाळातील वैयक्तिक कथा वेगवेगळ्या असू शकतात परंतु वर्तमान काळ केवळ त्यांच्यासाठीच नाही तर त्यांच्या कुटुंबांसाठीही उज्ज्वल भविष्याची स्वप्ने रंगवत आहे. लग्न समारंभातील त्यांच्या चेहऱ्यावरील हास्यातून हे स्पष्टपणे दिसून येत होते. त्यांना रोजगार देण्यासाठी घेतलेल्या एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. प्रभाकरन ह्यांच्या पुढाकारामुळे हे सर्व शक्य झाले आहे.
सध्या, ६५ आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी एलएमईएलमध्ये काम करत आहेत. त्यापैकी २७ प्रशासकीय विभागात, २९ नागरी/बांधकाम विभागात आणि ९ (नऊ) मेकॅनिकल विभागात काम करतात. त्यापैकी अनेकांनी आपले शिक्षण अर्धवट सोडून अगदी लहान वयातच नक्षलवादी गटात सामील झाले होते, त्यामुळे त्यांच्याकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता नव्हती. तथापि, एलएमईएलने स्वीकारलेल्या मानवतावादी दृष्टिकोनामुळे आणि गडचिरोली पोलिसांच्या शिफारशीमुळे, एलएमईएलने प्रथम आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना प्रशिक्षण देण्याचा आणि नंतर त्यांच्या कौशल्यांना अनुकूल असलेल्या नोकऱ्यांमध्ये सामील करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, त्यांना कोनसारी येथील लॉयड्स कौशल्य विकास आणि प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देण्यात आले. त्यांनी विविध व्यवसायांमध्ये प्रशिक्षणाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आणि खूप लवकर कौशल्ये आत्मसात केली. आता, ते खूप आनंदी आहेत आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यास आणि त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम असल्याचा त्यांना अभिमान आहे. एलएमईएलमध्ये त्यांच्या कौशल्यांमुळे मिळालेल्या आदरामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. यामुळे त्यांना जीवन, व्यावसायिकता आणि गडचिरोलीच्या विकासाकडे सकारात्मक दृष्टिकोन मिळाला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विकास प्रवासात बदल घडवण्याचे हे आत्मसमर्पण करणारे नक्षलवादी महत्त्वाचे योगदानकर्ते बनले आहेत. हे हात गडचिरोलीचे भविष्य सर्जनशीलपणे घडवत आहेत, जे बऱ्याच काळापासून औद्योगिकदृष्ट्या मागासलेले होते. शुक्रवारी ज्या आत्मसमर्पण नक्षलवाद्यांचे लग्न झाले त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य गडचिरोलीतील एका नवीन पहाटेची आणि त्यांच्या जीवनात वाढत्या आनंदाच्या निर्देशांकाची कहाणी सांगत होते.










