महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा मदतीचा हात

110

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. १८ : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने अपघातग्रस्त वीज कर्मचाऱ्याला उपचारासाठी मदत करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना मागासवर्गीय वीज कर्मचाऱ्यांसाठी संघटनात्मक कार्य करते. तसेच “मागासवर्गीय संघटन हे एक सामाजिक क्रांतीचे हत्यार आहे” या ब्रीदवाक्याच्या धर्तीवर सामाजिक बांधिलकी म्हणून ही मदत करण्यात आली. मुरूमगावव शाखेचे बाह्य स्त्रोत वीज कर्मचारी नरेश उसेंडी यांचा वीजवाहिनीवर काम करत असताना विद्युत अपघात झाला होता. त्यामुळे त्यांच्या उपचाराकरिता संघटनेच्या सभासदांकडून एक आर्थिक मदत म्हणून ३३,०५० रुपये रोख त्यांच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे सर्कल सचिव सुधीर चौधरी, कोषाध्यक्ष बी. टी. बोरकर, विभागीय अध्यक्ष योगेश सलामे, सचिव धनराज नन्नावरे, कोषाध्यक्ष सागर मासडकर, सर्कल सदस्य सचिन ढोके आदी उपस्थित होते.े

————————–