कारगिल विजय दिनानिमित्त गडचिरोलीत भर पावसात अभूतपूर्व श्रद्धांजली समारंभ!

65

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, २६ : कारगिल युद्धात भारतमातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर शहीदांना मानवंदना देण्यासाठी शनिवार (ता. २६) कारगिल विजय दिन अत्यंत भावनिक, पावसाळी पण प्रेरणादायी वातावरणात गडचिरोली शहरात साजरा करण्यात आला.

या विशेष दिवशी, कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ गडचिरोलीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. लॉयड मेटल अँड एनर्जी लिमिटेड, कोनसरी, कारगिल स्मारक समिती, शासकीय पुनर्नियुक्ती माजी सैनिक संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने हा विजय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कारगिल चौक येथे सकाळी ९.३० वाजता झालेल्या कार्यक्रमाला विविध स्तरांतील नागरिक, विद्यार्थी, माजी सैनिक, अधिकारी आणि समाजातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. भर पावसातसुद्धा राष्ट्रासाठी जिवंत श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागरिक ओले होत उभे राहिले. कार्यक्रमाची सुरुवात “अमर जवान” स्मारकास पुष्पचक्र व पुष्पगुच्छ अर्पण करून झाली. त्यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करण्यात आले. वातावरण भारावून गेले होते. संपूर्ण परिसरात ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ आणि ‘शहीद जवान अमर रहें!’ अशा घोषणा घुमत होत्या. यावेळी अनेकांनी डोळे पुसले. पावसाच्या थेंबांसारखेच भावनांचे थेंबही गालांवर ओघळले. कारगिल दुर्गा उत्सव मंडळातील सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी आपल्या छत्र्यांखाली उभे राहून, अनेकजण ओलेचिंब होऊन शहीदांना नमन करत होते. कोणताही त्रास न मोजता, केवळ देशभक्तीच्या प्रेरणेने ते उपस्थित होते, ही गोष्ट मन हेलावून टाकणारी ठरली. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.३० वाजता झाली. यावेळी लॉयड मेटल एनर्जीचे निवासी संचालक निवृत्त कर्नल विक्रम मेहता, यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार अशोक नेते, खासदार डाॅ. नामदेवराव किरसान, कारगिल चौकचे अध्यक्ष उदय धकाते, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष घिसूलाल काबरा, लॉयड्सचे हिम्मतसिंह बेडला, लॉयड्सचे संचालक नटराजन, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, माजी सैनिक जयवंत काटकर, कर्नल एस. के. महापात्रा, कर्नल महेंद्रसिंह, कर्नल रामनाथ स्वामी, मेजर जितेंद्र नागपाल, सुभेदार मेजर पंजननाथन, सुभेदार ऋषी वंजारी, कॅप्टन फगवा ओरन, सुभेदार रामप्रताप शर्मा, यशवंत सिंगारे, महादेव वासेकर, सुभाष नागमोती, मो. सलीम सय्यद, राजू भांडेकर, अरुण बुरांडे, दशरथ गव्हारे, मनोज जावळे, सोमनाथ वैरागडे, दौलत तलमले, सुरेंद्र पाल, दीपक मेश्राम, कैलास कुथे, संजय चौधरी, कैलास सिडाम, वामन ठाकरे, ईश्वर राऊत (नायब तहसीलदार), केशव वड्डे, नीलकंठ कुथे, घनश्याम समरीत, गुरुदेव सातपुते, धनराज गिरडकर, सुशील भोयर, खेमचंद सहारे,माजी सैनिक वालदे आदी माजी सैनिक व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आणि यशस्वीतेसाठी मंडळाचे उपाध्यक्ष कालू गोवर्धन, सचिव प्रकाश भांडेकर, मार्गदर्शक सुनिल देशमुख, मोतीराम हजारे, नंदू कुमरे, प्रकाश धकाते, महेंद्र मसराम, रुपेश सलामे,राजू डोंगरे,राजेंद्र साळवे,सुचिता धकाते, निलिमा देशमुख, वनिता भांडेकर, विद्या कुमरे, वनिता धकाते, अंजली भांडेकर आदींनी सहकार्य केले. राजीव गांधी प्राथमिक शाळा, गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय होता. संचालन नंदू कुमरे यांनी केले, तर आभार महादेव वासेकर यांनी मानले. हा कार्यक्रम केवळ श्रद्धांजली नव्हे, तर देशप्रेम, शौर्य आणि सामाजिक जागृतीचा संदेश देणारा प्रसंग ठरला. उपस्थितांनी ‘शहीदों को सलाम’ करत स्मारकासमोर नतमस्तक होत वीरांना कृतज्ञतेची मानवंदना दिली.या कार्यक्रमात शहीद सैनिकांच्या कार्याची माहिती देण्यात आली. वीर सैनिकांच्या कुटूंबातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कारगिल चौक येथे झालेल्या कारगिल विजय दिवसाच्या कार्यक्रमाला लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे सहकार्य (sponsorship)होते. या आम्हाला अभिमान असल्याचे कंपनी व्यवस्थापनाने म्हटले आहे. एलएमईएलचे निवासी संचालक ले. कर्नल. विक्रम मेहता या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.