Home Gadchiroli शहरातील दुर्गा मंदिरात चोरी करणारे सापडले पोलिसांच्या पंज्यात

शहरातील दुर्गा मंदिरात चोरी करणारे सापडले पोलिसांच्या पंज्यात

127

गडचिरोली, ता. ४ : शहरातील कँप भागातील दुर्गा मंदिरात शनिवार २ ऑगस्ट रोजी रात्री चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून देवाच्या मूर्ती व इतर धार्मिक साहित्य चोरले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस प्रशासनाने तत्काळ कारवाई करून एका महिलेसह चार आरोपींना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून चोरी गेलेल्या काही मूर्ती खंडित अवस्थेत जप्त करण्यात आल्या आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव अंबादास गणेश नान्हे (वय ३७) रा. मालेवाडा ता. कुरखेडा जि. गडचिरोली, अनिता गणेश नान्हे (वय ३५) रा. मालेवाडा ता. कुरखेडा जिल्हा गडचिरोली, योगेश शंकर गड्डमवार (वय २५) रा. रांगी तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली,गोपाल अण्णा मेडपल्लीवार राहणार सिंगापूर तालुका सावली जिल्हा चंद्रपूर असून त्यांच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. विशेष म्हणजे रांगी येथील योगेश गड्डमवार हा स्थानिक कारगील चौकात भंगारचा व्यवसाय करतो. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात धनंजय चौधरी, रोहित गोंगले, शिवा करमे, हेमंत गेडाम, दीपक लोणारे व वृषाली चव्हाण यांनी केली. विशेष म्हणजे मागील काही महिन्यांपासून गडचिरोली शहरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यापूर्वी काही चोरांनी मुख्य मार्गावरच्या मेडीकल स्टोअर्समध्येही चोरी केली होती. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

—————————————-