गडचिरोली आयटीआयत ‘सोलर टेक्निशियन’ नवा अभ्यासक्रम

168

शासकीय आयटीआय, गडचिरोली येथे नवीन ‘सोलर टेक्निशियन’ अभ्यासक्रम

 

गडचिरोली दि.५: पर्यावरणाचे संरक्षण आणि नैसर्गिक ऊर्जा स्रोतांचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीने सौर ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), गडचिरोली येथे शैक्षणिक वर्ष २०२५ पासून सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) हा एक वर्षाचा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे.
हा कोर्स दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असून, गडचिरोली संस्थेत २० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. याशिवाय, देसाईगंज येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत याच कोर्सचे दोन युनिट सुरू करण्यात आले आहेत, ज्यात एकूण ४० विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.
जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, सुरेश चौधरी यांनी उमेदवारांना काळाची गरज ओळखून या नवीन कोर्समध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन केले आहे. प्रवेश प्रक्रिया नियमित नियमांनुसारच होईल.
इच्छुक विद्यार्थी www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात. संस्थेत अर्ज भरण्याची आणि निश्चित करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथे संपर्क साधावा.

 

🌞 Solar Course Related:

#SolarTechnician

#सोलरटेक्निशियन

#GreenEnergy

#SolarTraining

#RenewableEnergy

🏫 Institute & Education:

#GovtITI

#ITIगडचिरोली

#शासकीयआयटीआय

#VocationalTraining

#SkillDevelopment

📢 General Awareness & Opportunity:

#नवीनअभ्यासक्रम

#CareerOpportunity

#गडचिरोलीन्यूज

#सौरऊर्जा

#JobReadySkills

#YouthEmpowerment