गडचिरोली साजरी होणार ग्रिन्सची जंगल जत्रा

64

ग्लोबल गडचिरोली न्यूज,

गडचिरोली, ता. ४ : निसर्ग संरक्षण व संवर्धन क्षेत्रात कार्यरत ग्रिन्स संस्थेच्या वतीने वन्यजीव सप्ताहानिमित्त सोमवार (ता. ६) ग्रिन्स जंगल जत्रा हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

स्थानिक पीएम श्री जवाहरलाल नेहरू नगर परीषद उच्च प्राथमिक शाळेत सोमवारी सकाळी ९ वाजता आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डाॅ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एस. रमेशकुमार राहतील. तसेच गडचिरोलीच्या उपवनसंरक्षक आर्या, विभागीय वन अधिकारी गणेश पाटोळे, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक सतीश चिचघरे आदींची प्रमुख उपस्थिती राहिल. या उपक्रमात गडचिरोलीतील विविध शाळांचे विद्यार्थी संघ जिल्ह्यातील महत्त्वाचे प्राणी, पक्षी, वनस्पतींबद्दल भाषण, पोस्टर, पथनाट्य, वेशभूषा अशा विविध माध्यमातून जनजागृती करणार आहेत. उत्तम प्रदर्शन केलेल्या संघाला प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्काराने रोख रक्कम, स्मृतिचिन्हाने सन्मानित करण्यात येईल. या उपक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

——————–